*कोकण Express*
*आई – वडिलांच नाव गर्वाने उंच करण्याच्या विचारातून कृती करा: सचिन कोर्लेकर*
जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या वतिने माजी राष्ट्रीयपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ननिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण साजरा करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ननिमित्त वाचन प्रेरणा दिन ११८ स्वयंसेवकांच्या सहभागातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षी १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले. येत्या काळात मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागात सरकारी तसेच खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि या संधीचा फायदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने एकदिवसीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे करण्यात आले.या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून युनिक अकॅडमी, कणकवली शाखेचे श्री.सचिन पोंभूर्लेकर हे होते. विद्यार्थांना मार्गदर्शन करत असताना विविध स्पर्धा परीक्षा तसेच राज्य सेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, अभ्यासक्रम, येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मार्ग कसा काढायचा या विषयी मार्गर्शन केले.
नियमित वाचन करणारे विद्यार्थी ज्ञानाच्या कक्षा रुंदावत रहातात. यासाठी वाचन हा छंद व्हायला हवा, असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी केले.
आजच्या आधुनिक काळात नवनवीन गोष्टींचे आकर्षण वाढून त्याचा उपयोग व अनुकरण करणे या अनुषंगानेच मोबाईलचा वापर इ-वाचनासाठी करावा असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री.वसीम सय्यद यांनी केले.
या प्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयीन कर्मचारी समन्वयक श्री.वसीम सय्यद, ग्रंथपाल श्री. तन्मय कांबळे, गुलशन फाउंडेशनचे श्री.विश्वनाथ तांबे व श्री.निलेश तांबे व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधि भक्ती पिसे व गुरुनाथ भोसले, अदिती भालेकर, जयश्री इंगले, मयुरी पवार, मयूर मोरे आदी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख श्री.वसीम सय्यद यांनी केले तर आभारप्रदर्शन भक्ती पिसे यांनी केले.
सुत्रसंचालन गुरुनाथ भोसले व छायाचित्रकार म्हणून जिग्नेश वारंगे यांनी बजावली.