*कोकण Express*
*नांदगाव तिठा येथे सापडलेला घोणस सापाला सरपंच पंढरी वायंगणकर यांनी दिले जीवदान ; सरपंचांचे सर्वत्र होते कौतुक*
नांदगाव तिठा येथील महमंद साठविलकर , यास्मिन साठविलकर यांच्या घराजवळ घोणस साप आढळून आला असून सर्पमित्र तथा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी सापाला जिवदान जीवदान दिले असून या सापाला जंगल मे भागात सोडून देण्यात आले आहे यावेळी त्यांच्यासोबत कमलेश पाटील व शैलेश टाकळे उपस्थित होते.
सदर आजचा घोणस जातीचा साप हा अत्यंत विषारी असल्याचे सर्पमित्र पंढरी वांगणकर यांनी बोलताना सांगितले आहे. सदर सापाला पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचे दिसत आहे. या आधी ही सरपंच व सर्प मित्र पंढरी वायंगणकर यांनी बरेच असे साप पकडून त्यांना जीवदान दिले असून त्यांनाही जंगलमय व भागात सोडून दिले होते.