ब्लॅकमेलिंग हा धंदा असणाऱ्यांनी धोरण आणि आचारसंहितेच्या बाता मारू नये

ब्लॅकमेलिंग हा धंदा असणाऱ्यांनी धोरण आणि आचारसंहितेच्या बाता मारू नये

*कोकण Express*

*ब्लॅकमेलिंग हा धंदा असणाऱ्यांनी धोरण आणि आचारसंहितेच्या बाता मारू नये*

*नितेश राणेंनी खुलेआम बैठक घेतली, उपरकर यांच्यासारखी बंद खोलीमध्ये नाही*

*मनसेने अधिकारी, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंग केल्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा*

*भाजपा कणकवली युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष नितीन पडावे*

शासकीय धोरण हा शब्द वापरून आमदार नितेश राणे यांचा सोबत अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल मनसेच्या दया मेस्त्री यांनी टीका केलेली आहे. पण शासकीय धोरणाअंतर्गत खंडणी घेणे हा देखील गुन्हाच आहे. त्यामुळे त्यामुळे आपली पात्रता किती आणि आपण बोलतो किती ते अगोदर दया मेस्त्री यांनी ओळखावे. दया मेस्त्री यांचे सोबत कोणी नसलेले नेते माजी आमदार परशुराम उपरकर हे ज्या वेळी मागच्या दरवाजाने आमदार झाले त्या वेळी अधिकाऱ्यांना आपल्या घराजवळ बोलावून ते त्यांची पूजा करत असायचे काय? पूजा करत असतील तर उपरकर आणि त्यांचे सहकारी असलेले दया मेस्त्री हे अधिकारी भेटल्या नंतर प्रशन सूटले नाही तरी गप्प का बसायचे? माहितीच्या अधिकारातील अर्ज देऊन उपरकर व मेस्त्री नेमके काय करतात ते जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना व जनतेला देखील माहिती आहे. कोणतेही शासकीय अधिकारी आमदार नितेश राणे यांच्या निवासस्थानी बैठकीला उपस्थित राहतात कारण आमदार राणे हे जनतेमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेतली. ती बैठक मागील दाराने किंवा लपुन घेतलेली नाही. पण या बैठकीमुळे विमनस्क झालेले काही जण मानसिक संतुलन बिघडल्या सारखे झाले आहेत. पण डोक्यात ब्लॅकमेलिंगचा भुसा भरलेल्यांच्या हे लक्षात येणार नाही. अधिकारी पदाचा गैरवापर या अधिकाऱ्यांनी केला असा आरोप करणारे दया मेस्त्री यांनी आतापर्यंत वाळूच्या गाड्या वाहतूक होताना देखील असेच आरोप केले. पण त्याचे पुढे काय झाले. एका धाब्यावर मेस्त्री यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. मग अशा गुन्हेगारी व खंडणी ची कृत्य करणाऱ्या वर बोलण्यास देखील मर्यादा येते. पण आमदार नितेश राणेंचा उल्लेख करत टीका केलात म्हणून तुमची औकात तुम्हाला दाखवून द्यायची ही वेळ आली. अधिकाऱ्यांच्या तक्रारी करणे अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे व यातून काही जमेल तेवढयाची तडजोड करणे हा मनसेच्या कणकवलीतील पदाधिकाऱ्यांनी धंदा मांडला आहे अशा चर्चा अधिकारी वर्गामध्ये व जनतेमध्ये सुरू आहे. जनतेच्या प्रश्नासाठी कुठे बैठका घ्यायच्या हा त्या बैठका देणाऱ्या अधिकारी व आमदार यांचा प्रश्न झाला. ज्यांच्या जवळ ग्रामपंचायतला उभा करण्यास साठी पण माणूस नाही अशा भंपकांनी लोकांना सल्ले देण्याऐवजी आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी काम करावे. चार-आठाने साठी ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांच्या तोंडी असे सल्ले देणे शोभत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कणकवलीत माहितीच्या अधिकारात अर्ज करणे व तक्रारी करणे या पुरतीच उरली आहे. त्यामुळे मेस्त्री यांच्या मागणीचा खुलासा करण्या एवढि मुळात मेस्त्री यांची कुवत नाही. बैठका घेण्यासाठी आदर्श सूचना आहेत व या आदर्श सूचनेप्रमाणे जनतेचे काम आदर्श करण्याकरिता आमदार नितेश राणे यांचे प्रयत्न आहेत. ज्यांना संध्याकाळच्या सत्रात मागील दारांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याची सवय आहे त्यांना हा जनतेच्या कामाचा आदर्श समजणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे कडून जर यापुढे माहितीच्या अधिकाराचा वापर करत किंवा अन्य प्रकारे ब्लॅकमेलिंग केले गेल्यास अधिकाऱ्यांनी, कर्मचारी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा मनसेच्या या साऱ्या प्रकाराचा पर्दाफाश केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!