*कोकण Express*
*सेवा पंधरवडा च्या निमित्ताने वेंगुर्ले शहरातील भाजपा च्या युवा कार्यकर्त्यांचे रस्त्यावरील खड्डे बुजवुन सेवाकार्य*
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा आयोजित केला जात असताना , वेंगुर्ले शहरातील भाजपा च्या युवा कार्यकर्त्यांनी हाॅस्पीटल नाका ते भटवाडी या नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीट च्या सहाय्याने बुजवुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला .
वेंगुर्ले तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा मध्ये आरोग्य शिबीर , रक्त दान शिबीर , नेत्रचिकीस्ता व मोतीबिंदू तपासणी शिबीर , स्वच्छता अभियान , वृक्षारोपण , विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप , मुलांना खाऊ वाटप , केंद्र सरकार च्या योजनांचे लाभ इत्यादी सेवाकार्य करून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस उस्ताहात साजरा केला . परंतु वेंगुर्ले शहरातील भाजपा च्या युवा कार्यकर्त्यांनी अनोखे असे सेवाकार्य करून एक नवीन पायंडा पडला .
यावेळी भटवाडी येथील युवा नेतृत्व प्रीतम उर्फ पींटू सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदित्य खानोलकर , बाळा गावडे ,
चिमलो आरावुज , दत्ताराम तावडे
भुषण सावंत , योगेश गोवेकर ,
सुभाष सोनुरलेकर , कपिल सावंत , प्रथमेष सावंत , शुभम सावंत , नवनाथ सावंत , आनंद कळेकर , सचिन मांजरेकर इत्यादी युवकांनी या सेवाकार्यात सहभागी होऊन नागरिकांना रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करुन दिला .