*कोकण Express*
*भाषा ही भावना व्यक्त करण्याचे प्रमुख साधन ; प्रा. खाड्ये*
*कासार्डे माध्म. विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा*
*कासार्डे:-संजय भोसले*
दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. हिंदी ही भारतातील महत्वपूर्ण भाषांपैकी एक मानले जाते, राष्ट्रीय भाषेचा अभिमान बाळगत आपण सर्वांनी हिंदी भाषा आत्मसात करायला हवी,कारण भाषा ही आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रमुख साधन असते.म्हणुन हिंदी ही प्रत्येकाला बोलता यायलाच हवी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मधुकर खाड्ये यांनी विद्यार्थ्यांना दिला.
राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड जि.परभणी हिंदी विषयाचे प्राध्यापक श्री.मधुकर घुगे, पर्यवेक्षक नारायण कुचेकर, तसेच हिंदी विभाग प्रमुख प्रा.रामचंद्र राऊळ, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,
पी.जे. काळे,सौ.रजनी कासार्डेकर,सौ.मानसी कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*विविधतेत एकता निर्माण करण्यासाठी हिंदी आवश्यक* – प्रा.मधुकर घुगे
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक मधुकर घुगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यात अनेक बाबतीत जरी विविध असली तरी या विविधतेतही एकता निर्माण करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाला हिंदी बोलता येणे ही काळाची गरज आहे.भाषा ही संवाद साधण्याचे सर्वात सोपे साधन आहे.आपल्या राष्ट्र भाषेचा सर्वांना अभिमान असायलाच हवा असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.
दरम्यान प्रा. राऊळ आणि पी.जे. काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले.याप्रसंगी पी.जे. काळे,प्रा. राऊळ यांनीही मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामचंद्र राऊळ आणि तर आभार सौ. रजनी कासार्डेकर यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धचेही आयोजन करून हा राष्ट्रीय हिंदी भाषा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. काव्य वाचन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. या स्पर्धेला परीक्षक म्हणून पी.जे. काळे,सौ. रजनी कासार्डेकर,व सौ. मानसी कुडतरकर यांनी कामगिरी पार पाडली.