*कोकण Express*
*बांधकाममंत्री रविंद चव्हाण यांचे कणकवलीत ढोल ताशांच्या गजरात होणार भव्य जंगी स्वागत*
*नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते रवींद्र चव्हाण यांचे ढोल ताशांच्या गजरात कणकवली पटवर्धन चौकात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 वाजता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन देखील श्री. नलावडे व सावंत यांनी केले आहे. कणकवली नगरपंचायतने गणेश चतुर्थी कालावधी करिता उभारलेल्या व्यासपीठाच्या ठिकाणी हे स्वागत करणार असून मंत्री झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमन होत असल्याने हे स्वागत देखील मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. नलावडे यांनी दिली.