*कोकण Express*
*मालवण मधील दोघांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश*
*माजी जि. प. सदस्य संजय आंग्रे यांनी केले स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरूच असून, आज सकाळी राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवलीतील एका पदाधिकाऱ्याच्या प्रवेशानंतर मालवण मधील उद्योजक अरुण तोडणकर व श्रीहरी खवणेकर या मालवण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. माजी जि. प. सदस्य संजय आंग्रे यांनी या दोघांचे शिवसेना शिंदे गटात स्वागत केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ कार्यकर्ते भास्कर राणे, माजी नगरसेवक भूषण परूळेकर, शेखर राणे, दीपक राऊत, किसन मांजरेकर, निलेश तेली, सुनील हरमळकर, दिलीप घाडीगावकर, सुनील पारकर, बाळू पारकर आदी उपस्थित होते.