देवबाग संगम त्सुनामी आयलंड विकसित व्हावे ; ड्रेझर द्वारे खाडीतील गाळ उपसा गरजेचा

देवबाग संगम त्सुनामी आयलंड विकसित व्हावे ; ड्रेझर द्वारे खाडीतील गाळ उपसा गरजेचा

*कोकण Express*

*देवबाग संगम त्सुनामी आयलंड विकसित व्हावे ; ड्रेझर द्वारे खाडीतील गाळ उपसा गरजेचा*

*दत्ता सामंत यांची भाजप नेते नीलेश राणे यांच्याशी चर्चा ; प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर*

*मालवण ःःप्रतिनिधी* 

पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या देवबाग गावातील सुनामी आयलंड पुनर्जीवित करण्यासाठी दत्ता सामंत यांनी भाजप नेते निलेश राणे यांचा माध्यमातून पुढाकार घेतला आहे. देवबाग संगम परिसरातील कर्ली खाडीपात्रातील गाळ उपसा व्हावा. यासाठी सक्शन ड्रेझर मशीन शासन स्तरावरून उपल्बध करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. अशी मागणी दत्ता सामंत यांच्या वतीने निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी मंदार लुडबे व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. मालवण देवबाग गावात पर्यटन जलक्रिडा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो, आणि स्थानिक पर्यटन व्यावसायीक आपली उदरनिर्वाह त्या व्यवसायावर करतात. पण यंदा समुद्राच्या उलट प्रवाहामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात आहे. समुद्राचा भू-भाग प्रमाणापेक्षा वाहून गेला आहे त्यामुळे खाडीतील गाळ जर देवबाग संगमावरील बेटावर टाकला तर पर्यटन व्यवसायीकांना भरपूर फायदा होईल. तारकर्ली खाडीत असणारा ड्रेजर जर देवबाग खाडीत गाळ उपसा करण्याकरीता दिला तर देवबाग संगम आणि सुनामी आयलंड मोठ्या प्रमाणात विकसीत होईल आणि पर्यटन व्यवसाईक आणि पर्यटक सुरक्षित राहतील. तरी आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करुन तारकर्ली बंदरातील ड्रेजर देवबाग खाडीत मिळावा ही विनंती आहे. अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!