*अण्णा भाऊंनी अनिष्ट रूढी, परंपरा नाकारल्या – डॉ. महेंद्र कामत*

*अण्णा भाऊंनी अनिष्ट रूढी, परंपरा नाकारल्या – डॉ. महेंद्र कामत*

*कोकण Express*

*अण्णा भाऊंनी अनिष्ट रूढी, परंपरा नाकारल्या – डॉ. महेंद्र कामत*

*कणकवली ःःप्रतिनिधी* 

अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील लक्षणीय लेखक आहेत. दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ अल्पशिक्षित असले तरी व्यावहारिक जगाच्या शाळेत पात्र शंभर टक्के यशस्वी झाले. त्यांनी जे समाजात पाहिलं तेच आपल्या लेखणीतून उतरवलं. समाजातील अनिष्ट, रूढी ,परंपरा अस्पृश्यता नाकारणारे वास्तव मांडले. विषमतेंच्या गर्तेत रुतलेल्या समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे अजरामर साहित्य लेखन त्यांनी निर्माण केले अण्णा भाऊच्या साहित्यात मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाचा समन्वय असलेला दिसून येतो.
अण्णाभाऊंना समजून घेण्यासाठी त्यांच्या साहित्याचे वाचन केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. डॉ.महेंद्र कामत यांनी केले.
कणकवली महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी यांचा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी विचार मंचावर प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ.महेंद्र कामत, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. युवराज महालिंगे प्रा. हरिभाऊ भिसे विचारमंचावर उपस्थित होते. प्रा.डॉ.सोमनाथ कदम यांनी लोकमान्य टिळक यांच्या राजकीय कार्यावर प्रकाशझोत टाकला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेन्द्रकुमार चौगुले यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर प्रकाश टाकला. लोकमान्य टिळक यांची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विचारसारणी तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या बहुजन सामाज वर्गातील कधीही प्रवाहात न आलेले विदारक साहित्य चित्रणाचे विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे .अण्णाभाऊंचे लेखन साहित्य व लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा आजच्या विद्यार्थ्यांनी जपला पाहिजे. कारण लोकमान्य टिळक हे लोकमान्य आणि अण्णा भाऊ साठे हे लोकशाहीर होते म्हणजे लोकांनी त्यांना आपले मानले होते यावरूनच आपल्याला त्यांच्या कार्याची ओळख स्पष्ट होते. म्हणजेच त्यांचे विचार आणि साहित्य समाजाला मान्य होते असा त्याचा अर्थ आहे असे मत डॉ.चौगुले यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. युवराज महालिंगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीनाक्षी सावंत व आभार प्रा.स्वीटी जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक,विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!