*कोकण Express*
*कलमठ गावातील १० वी, १२ वी उत्तीर्ण व गुणवंतांचा संदिप मेस्त्री यांनी घरोघरी जाऊन केला सत्कार*
*कणकवली ः प्रतिनीधी*
कलमठ गावातील गुणवंतांचे गेली अनेक वर्षे संदिप मेस्त्री यांच्या वतीने घरोघरी जाऊन अभिनंदन केले जाते. तसेच लागणारे शैक्षणिक दाखले वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न आणि सहकार्य केले जाते. यावर्षी देखील संदिप मेस्त्री यांनी १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेट वस्तू आणि अभिनंदन पत्र देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.