*कोकण Express*
*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वैभववाडी तालुका संपर्क सचिव ज्ञानेश्वर मोरे यांनी जांभवडे येथे क्रिकेट स्पर्धेस दिली भेट*
*वैभववाडी/प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वैभववाडी तालुका संपर्क सचिव ज्ञानेश्वर मोरे यांनी आदर्श क्रिडा मंडळ जांभवडे येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेस भेट देऊन सर्व खेळांडुंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनसे वैभववाडी तालुका संपर्क सचिव ज्ञानेश्वर मोरे यांच्या शुभहस्ते टॅास उडवून सामन्यांना सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आदर्श क्रिडा मंडळाचे आधारस्तंभ, समाजसेवक दशरथ पवार, मानद सचिव महेश पवार, अध्यक्ष कु.कमलाकर पवार, उपाध्यक्ष विनायक चंदुरकर, सचिव रंगनाथ पवार, सहसचिव मंगेश पवार, खजिनदार रुपेश मोरे, सहखजिनदार रोहित पवार, कार्याध्यक्ष पांडुरंग पवार, सल्लागार विश्वनाथ पवार, मंडळाचे आधारस्तंभ गोरखनाथ पवार, रविंद्र वाडेकर, श्रीधर रांबाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ पवार, संतोष पवार, अक्षय पवार उपस्थित होते.