*कोकण Express*
*अयशस्वी हत्ती हटाव मोहिमेच्या विरोधात केर ग्रामस्थांचे अनोखे “जागर आंदोलन”..*
*ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी…*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
हत्तींना हटवण्यास जमत नसेल तर हत्तीबाधीत क्षेत्रातील युवकांना शासकीय नोकरीत आरक्षण द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी जागर आंदोलनात केली. केर ग्रामस्थांनी हत्ती हटाव मोहीम अयशस्वी ठरलेल्या वनविभागाचा निषेध करण्यासाठी जागर आंदोलन छेडले. यावेळी वनविभाग आणि शासनाच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान आपल्या मागण्यांचा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचविला जाईल, अशी ग्वाही उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर अखेर रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी सरपंच मिनल देसाई, उपसरपंच महादेव देसाई, माजी सरपंच प्रेमानंद देसाई, रत्नकांत देसाई, गोपाळ देसाई, तुकाराम देसाई, अनंत देसाई आदीसह ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपवनसंरक्षक श्री.नानवर व त्यांची तालुकास्तरावरील टीमही उपस्थीत होती.