*कोकण Express*
*महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजना समिती अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांच्या घरी दिली भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र शासनाच्या विधान मंडळाची रोजगार हमी योजनेची समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना समिती अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे व सदस्य आमदार विक्रम सिंह सावंत यांनी राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक अबीद नाईक यांच्या घरी भेट दिली त्यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने नाईक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले यावेळी सौ चंद्रिकापुरे देखील उपस्थित होत्या
यावेळी त्यांनी देवगड वैभववाडी कणकवली सुरु असणाऱ्या विकास कामाच्या बाबतीत चर्चा करून समाधान व्यक्त केले व इतर कामासंदर्भात ही देखील चर्चा केली. यावेळी कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने ,तहसीलदार रमेश पवार बीडिओ अरुण चव्हाण , दिलीप वर्णने, विलास गावकर, विषाल ठाणेकर, इमरान शेख ,अनिस नाईक, अमित केतकर, गणेश चौगुले ,विशाल पेडणेकर, निशिकांत कडुलकर व राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते