*कोकण Express*
*नगराध्यक्ष नलावडे – बंडू हर्णे यांचे टेंबवाडी रहिवाशांनी मानले आभार…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील टेंबवाडी प्रभागातील शिंदे घर ते एस एम हायस्कूलकडे जाणारा मार्ग अनेक वर्ष प्रलंबित होता. त्यामुळे नागरिकांची अनेक वर्ष गैरसोय होत होती, त्यामुळे आज हा रस्ता मोकळा झाला आहे, त्यामुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदर मार्गासाठी लागणारा भूखंड त्या मार्गातील रहिवाशींनी उपलब्ध करून दिली, तसेच ह्या कामासाठी लागणारा विकास निधी तत्पर उपलब्ध करून दिला त्यासाठी आमदार नितेश राणे, कणकवली शहराचे नगराध्यक्ष समिर नलावडे व उपनराध्यक्ष बंडू हर्णे, कणकवली नगर पंचायतीचे सर्व सत्ताधारी नगरसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
यावेळी टेंबवाडीतील रहिवासी माजी नगरसेवक अभय राणे, नगरसेवक अभी मुसळे, महेश सावंत, युवा मोर्चा कणकवली शहराध्यक्ष सागर राणे, आत्माराम (दादू) राणे, व्यंकटेश सावंत, औदुंबर राणे, मुंडले गुरुजी, धनंजय कसवणकर, ओंकार राणे, यश पालव, सुधाकर राणे संदेश आडेकर, संदेश चव्हाण, उपस्थित होते.