*कोकण Express*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार साजरी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार साजरी केली जात असून दि.२१/०३/२०२२ रोजी सकाळी ६.३० वाजता महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, ता.जुन्नर, पुणे येथे मनसे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा.श्री. अमित राज ठाकरे हे अभिषेक व पूजन करणार आहेत. त्याचप्रमाणे सकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे, नेते मा.अमितजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका च्या वतीने बांदा याठिकाणी मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांना मिठाई वाटप करण्यात यावेळी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव घोषणा देण्यात आल्या यावेळी उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, बांदा विभागीय अध्यक्ष अंकुश सावंत, उपतालुकाध्यक्ष सुधीर राऊळ, विष्णू वसकर,मळगाव शाखाअध्यक्ष राकेश परब, रोनापाल शाखाध्यक्ष प्रज्वल गावडे, निरवडे शाखाध्यक्ष प्रशांत निरवडेकर, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, उपस्थित होते.