मराठीसोबत पाच भाषा शिकण्याचा संकल्प करा!

मराठीसोबत पाच भाषा शिकण्याचा संकल्प करा!

*कोकण Express*

*मराठीसोबत पाच भाषा शिकण्याचा संकल्प करा!*

*सिंबायोसिस विद्यापीठात पंतप्रधानांनी केले आवाहन*

विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, खूप हसा, फिट राहा आणि देशाला उंचीवर घेऊन जा. आपली ध्येय ठरवताना आपल्या देशासाठीही ध्येय ठरवा आणि असे जेव्हा होईल तेव्हा आपला देश विकासाच्या उंचीवर असेल. विद्यार्थ्यांनी वर्षभरासाठी थीम ठरवा, त्याच्यावर मेहनत घ्या, तुमच्या कल्पना, ज्ञान याचा वापर करून एक भारत, श्रेष्ठ भारतचे स्वप्न साकार करा असे भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सिंबायोसिस इंटरनॅशन विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना मागर्दर्शन केले आहे. तसेच सुवर्णमहोत्स सोहळ्याला आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

सिंबायोसिस या एवढ्या उंचीवर पोहचला आहे यामध्ये अनेक लोकांचे श्रेय आहे. सिंबायोसिस मध्ये ८५ देशातील जवळपास ४५ हजार विद्यार्थी शिक्षणासाठी आहेत. अशी माहिती पीएम मोदींनी दिली आहे. पुढे त्यांनी सांगितले की, देशात युवा पिढीसाठी अनेक संधी निर्माण होत आहेत. याचा युवापिढीने फायदा घ्यावा स्टार्टअप सुरु करावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी युवापिढीला केले आहे.

सुवर्णमहोत्सवाचा दिवस साधून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एक संकल्प करण्यास पंतप्रधानांनी सांगितले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यापीठातून बाहेर पडताना मराठी सोबत त्या विद्यार्थ्याने इतर पाच भाषा शिकण्याचा संकल्प करण्यास सांगितले आहे. यावेळी ऑपेरेशन गंगा बद्दलही पंतप्रधानांनी सांगितले आहे.

रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या युक्रेनमधील नागरिकांना मायदेशी आणण्यात इतर देशांना अनेक अडचणी येत आहेत. मात्र, भारताने ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून ते करून दाखवले आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था कशी सुधारत हेही त्यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, जगातील तिसरा सर्वात मोठी हब स्टार्टअप इको सिस्टीम आपल्या देशात आहे. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेक इंडिया आणि आत्मनिर्भर भारत सारखे मिशन जगात प्रतिनिधीत्व करत आहे. आजचा भारत विकसित आहे, प्रतिनिधित्व करत आहे आणि संपूर्ण जगावर प्रभावही पाडत आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!