*कोकण Express*
*आमदार वैभव नाईक यांनी दीला चेंदवण गावातील विकास कामांसाठी निधी*!
▪️शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या हस्ते झाली भुमीपुजने*
*कुडाळ/ प्रतिनिधी*
चेंदवण गावातील विकास कामांसाठी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत असताना आज चेंदवण नेरकर घाटी रस्ता आणि माऊली मंदिराजवळील शाळेला सभामंडपाचे भुमिपुजन शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या हस्ते झाले
यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले की दोन्ही लोकप्रतिनिधी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्यांना जो जो विकास कामांसाठी निधी साठी शब्द दीला तो शब्द पुर्ण केला कार्यकर्त्यांना नाराज कधीच केले नाही या महीन्यात सुचवलेले काम दोन महीन्यांनी व्हायलाच पाहिजे हाच विश्वास दाखवल्यामुळे चेंदवण सरपंच सौ उत्तरा धुरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची ग्रामपंचायत गावाने विश्वास ठेऊन दीली आहे त्याचे सार्थक निश्चित होत आहे असे श्री बंगे यांनी सांगितले
यावेळी सरपंच सौ धुरी म्हणाल्या मला माझे सहकारी सदस्य यांचे पुर्ण मोलाची साथ मिळत असुन आज शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे करताना समाधान मिळत आहे तसेच खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळाला म्हणून आज कोट्यावधी रुपयांची निधी चेंदवण गावात आणण्यास यश मिळाले असेही सौ धुरी म्हणाले
यावेळी शिवसेना नेरुर जि प उपविभाग प्रमुख प्रशांत तेंडुलकर, शिवसेना कुडाळ तालुका मागासवर्गीय तालुकाप्रमुख भुपेश चेंदवणकर ग्रामपंचायत सदस्या सौ रेवती तोरसकर, ग्रामपंचायत सदस्या तनया आंबेकर, ग्रामपंचायत सदस्या चंद्रभागा चेंदवणकर, ग्रामपंचायत सदस्या शारदा परब, ग्रामपंचायत सदस्या अपुर्वा टुंबरे, ग्रामपंचायत सदस्य निलेश गुरव, शिवसेना महीला आघाडी विभाग प्रमुख प्रणाली तेंडुलकर, विजय मेस्त्री, माजी सरपंच भरत गुरव, आनंदी तोरसकर, लक्ष्मी तोरसकर, काकी भरडकर, रवि तोरसकर, रजनी तेंडुलकर, सुरेखा तेंडुलकर, सुनिता भरडकर, पल्लवी गुरव, विष्णू चेंदवणकर, लक्ष्मण चेंदवणकर, सोमा घाडी, महेंद्र भरडकर, मनोहर भरडकर, अनिल गुरव, नरेश मयेकर उपस्थित होते कार्यक्रम आभार प्राथमिक शाळा चेंदवण पडोसवाडी मध्ये झाला यावेळी मुख्याध्यापक सचिन मदने यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले

