कणकवलीत कबीर आर्टचा.. ‘ए आपण चहा घ्यायचा’? उद्या नाट्यप्रयोग

कणकवलीत कबीर आर्टचा.. ‘ए आपण चहा घ्यायचा’? उद्या नाट्यप्रयोग

*कोकण  Express*

*कणकवलीत कबीर आर्टचा.. ‘ए आपण चहा घ्यायचा’? उद्या नाट्यप्रयोग..*

*हसत, खेळत पाहण्यासारखं हलकं फुलकं नाटक ; स्थानिक कलाकारांचा सहभाग*

*सिंधुदुर्ग :*

 कोरोनामुळे नाटकापासून आपण दोन वर्षे दूरावलो होतो, नाटक ही जिवंत कला आहे. कबीर आर्ट निर्मित..’ए आपण चहा घ्यायचा’? लेखक चं.प्र. देशपांडे यांच्या लेखणीतून हे नाटक लिहले गेलं आहे. हसत खेळत हलकं फुलकं पाहण्यासारखं नाटक आहे. कौटुंबिक नवरा बायको मधील संवाद, संशय यावर नाटक असून कबीर आर्ट निर्मित..’ए आपण चहा घ्यायचा’? उद्या ५ मार्चला सायंकाळी ७.३० वा. पहिला नाट्यप्रयोग जिल्ह्यात कणकवलीतील आचरेकर प्रतिष्ठान मध्ये होत असल्याची माहिती दिग्दर्शक अभिजित झुंजारराव यांनी दिली.

वागदे येथील गोपुरी आश्रम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कलाकार-अभिनेता विकास तांबे, भाग्यश्री पाणे, निलेश पवार, सुत्रधार राजेश करंजेकर आदी उपस्थित होते.

कबीर आर्ट निर्मित.. ‘ए आपण चहा घ्यायचा’? हा पहिला नाट्यप्रयोग कणकवलीत होईल. त्यानंतर मुबंई पुणे, नाशिक, गोवा या भागात प्रयोग होणार आहेत. या नाटकात नवरा बायको अशी दोन जोडपी आहेत. एक हमालाचे पात्र आहे, तो त्या जोडप्यामधील वादावर सोल्युशन देत असतो, आपल्या घरात घडत असलेल्या खोपरखळ्या मारल्या जातात, असे राजेश करंजेकर यांनी सांगितले.

अभिनेत्री भाग्यश्री पाणे म्हणाल्या, नाटक हे आमच्या जवळचे आहे, दोन वर्षांचा कालावधी कोरोनाचा होता, त्यावेळी नाट्य चळवळ थांबली आहे. हे नाटक प्रेक्षकांपर्यत घेऊन जात आहोत. माझी प्रभा ची भूमिका असून मी ती सादर करत आहे.

विकास तांबे म्हणाले, नाटक ही कला कलाकाराला जगवतो, चांगला विषय आहे, त्यासाठी आम्ही चांगला प्रयत्न केला. नक्की पहा नक्कीच आवडेल.

अभिनेता निलेश पवार म्हणाले, नवरा बायकोच्या संवाद कसा असतो, रुपक चांगलं आहे. हमाल हा ओझी वाहणारा नसून तो समाजाचे ओझं वाहणारे पात्र आहे. भाषा चांगली आहे, या नाटकात.. सर्वसामान्य नाटक व्हावं, ही आमची इच्छा आहे

कबीर आर्ट निर्मित..’ए आपण चहा घ्यायचा’? दोन अंकी नाटकाचे लेखक चं. प्र. देशपांडे, दिग्दर्शक अभिजित झुंजारराव, कलाकार-अभिनेता विकास तांबे, भाग्यश्री पाणे, निलेश पवार, कांचन खानोलकर, नाटकाचे सूत्रधार राजेश करंजेकर, संगीत-प्रफुल्ल गुरव, संगीत संयोजक ओमकार जाधव, प्रकाश योजना श्याम चव्हाण, नेपथ्य राहुल तारी, प्रकाश योजना सहाय्य दादा कोरडे, अक्षय धांगट आदी कलाकारांनी काम केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!