*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी होणार निर्णय*
*कणकवली :मयुर ठाकूर*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील मुंबई हायकोर्टातील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता न्यायमू्ती चंद्रकांत भडंग हे या प्रकरणात सोमवारी निकाल देणार आहेत. दरम्यान, निकाल येईपर्यंत नितेश राणे आणि संदेश सावंत यांना अटकेपासून मिळालेला दिलासा कायम असणार आहे.