कणकवली विधानसभा मतदार संघाच्यावतीने सुशांत नाईक यांचा सत्कार

कणकवली विधानसभा मतदार संघाच्यावतीने सुशांत नाईक यांचा सत्कार

*कोकण Express*

*कणकवली विधानसभा मतदार संघाच्यावतीने सुशांत नाईक यांचा सत्कार…!*

*युवा सेनेचे नेटवर्क स्ट्रॉंग करणार – सुशांत नाईक*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनेचे अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेनेच्या अधिकारीपदाची जबाबदारी टाकली आहे. ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पेलून जिल्ह्यात युवा सेनेचे नेटवर्क स्ट्रॉंग करणार. तसेच शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी मी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग युवा सेनेचे अधिकारी, जिल्हा बँकेचे संचालक, नगरसेवक सुशांत नाईक यांनी केले.

जिल्हा बँकेच्या संचालक पदी व युवा सेना जिल्हाअधिकारी सुशांत नाईक यांची नियुक्ती झाल्या बद्दल कणकवली मतदार संघाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय पडते जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,डॉ. प्रथमेश सावंत, महेश उर्फ गोट्या कोळसुलकर, कन्हैया पारकर, संदेश सावंत पटेल,जिल्हा समन्वयक गीतेश कडू,शेखर राणे,मंगेश सावंत,राजू राठोड,अँड.हर्षद गावडे,प्रतीक्षा साटम,अमित मयेकर,तेजस राणे,दया कुडतरकर,रुपेश आमडोस्कर, विलास गुडेकर,ललित घाडीगांवकर, किरण वर्दम,रिमेश चव्हाण,आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!