*कोकण Express*
*भाजपच्या खोट्या फेसबुक अकाउंट वरून माझ्याबद्दल संभ्रम करण्याचा केविलवाणाा प्रयत्न*
*आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक यांच्या सहकार्यानेच शिवसेनेचे 8 संचालक विजयी*
*शिवसेना नेते अध्यक्ष सतीश सावंत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग ब्रेकिंग न्यूज नावाचे सोशल मीडिया चॅनल स्वाभिमान संघटनेची माणसं चालवत असून आपल्याबाबत निराधार वृत्त प्रसिद्ध केले आहे, पक्षातील गद्दारी मुळे आपला पराभव झाला अशा प्रकारचा त्या वृत्तात माझ्या तोंडी आरोप घालून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत आ.दीपक केसरकर, आ. वैभव नाईक यांनी केलेल्या सहकार्यामुळेच शिवसेनेचे 8 संचालक निवडून आले.मात्र भाजपा जिल्हा प्रमुख राजन तेली हे आ. नितेश राणेंच्या कपट आणि कारस्थानी नीतीचे बळी ठरले. नितेश राणेंनी जिल्हा बँकेतील पराभवानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिलेल्या राजीनाम्यावर बोलावे. भाजपाच्या बोगस फेसबुक अकौंन्ट वरून शिवसेनेत नसलेले संभ्रम निर्माण करण्याचे बालिश प्रयत्न केले जात आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याचेही बँकेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष सतीश सावंत यांनी स्पष्ट केले आहे.