*कोकण Express*
*मालवणात १०० टक्के मतदान*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुुक*
*मालवण केंद्रावर शांततेत मतदान*
*मालवण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्या बँकेच्या १९ संचालक जागांच्या निवडणुकीसाठी गुरुवार ३० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मालवण तहसीलदार कार्यालय येथील मतदान केंद्रावर तालुक्यातील ११० मतदारांपैकी सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान संपण्याची वेळ सायंकाळी ४ असताना १०० टक्के मतदान ३ वाजताच पूर्ण झाले. अशी माहिती मतदान केंद्र अधिकारी यांनी दिली.
मतदान केंद्राबाहेर काही अंतरावर भाजप तसेच शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी यांनी बैठक व्यवस्था करत गर्दी केली होती.
*मालवणातील मतदार:*
विकास संस्था : ३० मतदार, पतसंस्था : १६ मतदार, पणन संस्था : ७ मतदार, मजूर संस्था : २० मतदार, दुग्ध संस्था : १६ मतदार, गृह संस्था : १३ मतदार, इतर संस्था : ८ मतदार असे एकूण ११० मतदार मालवण तालुक्यात होत