*कोकण Express*
*▪️कार्यालयाचा उपयोग हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच झाला पाहिजे*
*▪️राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आदेश*
*▪️कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयाचा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्तने जिल्ह्यात दाखल झालेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कणकवलीत ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कणकवलीत एस एम हायस्कुल जवळ मुद्रा कमर्शियल हब बिल्डींग मध्ये राष्ट्रवादीच्या कणकवली तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनानंतर बोलताना जयंत पाटील म्हणाले, या कार्यालयाचा उपयोग हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झाला पाहिजे या दृष्टीने काम करा. या कार्यालयाच्या माध्यमातून कणकवली तालुक्याच्या जनतेचे प्रश्न ऐकणे, सोडवणे व त्याचा पाठपुरावा करणे या दृष्टीने काम लवकरच सुरू झाले पाहिजे. कणकवली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक बूथ पर्यंत पोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन देखील पाटील यांनी याप्रसंगी केले. यावेळी आमदार शेखर निकम,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी युवती सेल च्या प्रदेशाध्यक्ष सुलक्षणा सलगर, जिल्ह्यध्यक्ष अमित सामंत, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, तालुका निरीक्षक काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक, जिल्हा बँक संचालक आर टी मर्गज, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव,मालवण तालुकाध्यक्ष विश्वास साठे, निखिल गोवेकर,युवक शहराध्यक्ष संदेश मयेकर, युवक विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, विनोद मर्गज, प्रफुल्ल सुद्रीक, विलास गावकर, अभिनंदन मालडकर, राजेश पताडे, श्रीकृष्ण ढेकणे, सुधा कर्ले, वैभव सावंत, आदी उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान जयंत पाटील यांच्या स्वागताच्या वेळी सिंधू गर्जना ढोल पथकाने केलेल्या स्वागताने जयंत पाटील भारावून गेले.