बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा

📅 २९ ऑक्टोबर, २०२६👁 २ब्रेकिंग#नितेश राणे
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा

*कोंकण एक्सप्रेस

*मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ

*मच्छीमार, मत्स्यशेतकरी आणि मत्स्यव्यावसायिकांना घरबसल्या अर्ज करता येणार; प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान होणार

*मुंबई

राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे महाडीबीटी २.० प्रणालीवर मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी शासन प्रक्रिया पुनर्रचना (Government Process Re-engineering – GPR) अंतर्गत विविध सुधारणा करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा

या सुविधेमुळे राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना संबंधित योजनांसाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्ज प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रांची मागणी आणि ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता कमी होणार आहे. उपलब्ध शासकीय डेटाबेसच्या माध्यमातून आवश्यक माहिती प्राप्त करणे तसेच विविध प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात

या ऑनलाइन प्रक्रियेमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून, लाभार्थ्यांना अनुदान थेट आधार-संलग्न बँक खात्यात जमा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुलभ होणे, कागदपत्रांची संख्या कमी होणे आणि सेवांचा जलद निपटारा होणे यामुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे.

डिजिटल सेवांमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरातून लाभार्थ्यांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे, प्रशासकीय प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे आणि योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ

महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटीच्या

https://mahadbt2.maharashtra.gov.in/

या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मुंबई मधील अधिक बातम्या

अधिक पहा →