बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृह कोल्ड स्टोरेज बंद

📅 २२ ऑक्टोबर, २०२६👁 ८ब्रेकिंग
*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृह कोल्ड स्टोरेज बंद

*कोंकण एक्सप्रेस

*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवगृह कोल्ड स्टोरेज बंद
*सावंतवाडी : प्रतिनिधि

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील डेड बॉडी कोल्ड स्टोरेज (शवगृह शीतपेटी) बंद पडल्यामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.याबाबत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांना माहिती दिली होती. डॉ. रेड्डी यांनी तात्काळ पुणे येथील मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर कंपनीला कळवले असून कंपनीचे टेक्निशियन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.टेक्निशियनने तपासणी केली असता कोल्ड स्टोरेज मशिनरीचा एक स्पेअर पार्ट - सेन्सर खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. हा सेन्सर पुणे येथून दोन दिवसात येणार असून त्यानंतर शवगृह कोल्ड स्टोरेज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती श्री. राजू मसुरकर यांनी दिली.तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून -विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांनी आमदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयाला दिलेली अतिरिक्त शव शीतपेटी उपलब्ध आहे.सावंतवाडी भटवाडी, निरुखे येथील कॅन्सर हॉस्पिटल येथे निधन झालेल्या व्यक्तींसाठी सहा शवगृह कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध असून लाईट गेल्यानंतर जनरेटरची सोय देखील आहे. यासाठी कॅन्सर हॉस्पिटलकडून 3500 रुपये आकारले जातात, अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांनी दिली आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →