बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

वेंगुर्ला शहरात दुर्गामाता दौडला प्रतिसाद

📅 २० ऑक्टोबर, २०२६👁 १५#nitesh rane
वेंगुर्ला शहरात दुर्गामाता दौडला प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस

*वेंगुर्ला शहरात दुर्गामाता दौडला प्रतिसाद

*वेंगुर्ला : प्रतिनिधि

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जागवणारी आणि हिंदू समाजात राष्ट्रभक्ती व धर्मजागृतीची प्रेरणा देणारी श्री दुर्गामाता दौड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वेंगुर्ला विभाग व गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वात वेंगुर्लेत सुरु आहे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत होत असलेल्या या दौडीची आज नववी माळ सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवतीर्थ (छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक, माणिकचौक) येथे संपन्न झाली .

शिवतीर्थ येथे प्रतिमापूजन, शस्त्रपूजन आणि प्रेरणामंत्र पठण करून ही दौड शिवतीर्थ(माणिकचौक) - कॅम्प काॅर्नर दुर्गामाता व परत शिवतीर्थ अशी संपन्न झाली.यामध्ये प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, सुरेंद्र चव्हाण, प्रज्वल कोंयंडे, संदिप कोयंडे, शरद मेस्त्री, सत्यवान परब, अमोल आरोस…

मळेवाड कोंडुरे येथील सर्व बंधारे दुरुस्ती कामाला मंजुरी, जि प सदस्य सातोसकार प स सदस्य मराठे यांच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार

सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील असलेल्या 6 बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रात 6 काँक्रिट बंधारे असून मोठ्या प्रमाणात हे बंधाऱ्यांच्या माध्यमातून नदीचे पाणी अडवले जाते. यामुळे मळेवाड गावातील अनेक विहिरी व शेतजमिनी ओलिताखाली येतात. बरीच वर्षे झाल्याने या बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे होते.काही बंधारे नादुरुस्त झाल्याने त्यात पाणी अडवणे बंद होते. मात्र आता कमी पाऊस पडल्याने ठीक ठिकाणी पाणी अडवून ते जमिनीत मुरावे असा उपक्रम शासनाने हाती घेतला असून याच अनुषंगाने अशा बंद अवस्थेतील व दुरुस्ती करणे गरजेचे आहे अशा बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे मळेवाड कोंडुरे गावातील कोंडुरे कदमवाडी, मळेवाड राणेवाडी, मळेवाड नाईकवाडी,मळेवाड भटवाडी,मळेवाड चव्हाणवाडी मळेवाड म्हापसेकरवाडी या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल.यामध्ये बंधाऱ्यांच्या प्लेट,गाळ काढणे, प्लेट गाळे दुरुस्त करणे, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे समाविष्ट आहेत. या सर्व कामांचा जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर व पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून सदरची कामे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केल्या बद्दल पालकमंत्री राणे यांचे आभार मानण्यात येत आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

वेंगुर्ला मधील अधिक बातम्या

अधिक पहा →