बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था

📅 १८ ऑक्टोबर, २०२६👁 १०ब्रेकिंग#संदीप चौकेकर
शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था

*कोंकण एक्सप्रेस

*शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था

*आजारी रुग्णांसाठी रस्ता ठरतोय त्रासदायक; रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी

*कणकवली : संजना हळदिवे

शिरवल येथील खासकीलवाडी परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः आजारी रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच रस्त्याचे खडीकरण , डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी केली आहे.

या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. जुनी रस्त्यावरील खडी उखडून आली आहे. चढ उताराच्या ठिकाणी झालेली रस्त्याची दुरावस्था वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. हा रस्ता खराब झाल्याने वाहनचालकांना सावधपणे वाहने चालवावी लागत आहेत. दैनंदिन कामानिमित्त बाहेर पडणारे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना या रस्त्यावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वेळ आणि श्रम खर्च होत असून, प्रवासादरम्यान गैरसोय सहन करावी लागत आहे.

आजारी रुग्णांची सर्वाधिक गैरसोय

शिरवल खासकीलवाडी परिसरातील आजारी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना रस्त्याच्या खराब स्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने वेळेत उपचारासाठी पोहोचण्याबाबतही चिंता निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा रस्ता अधिकच त्रासदायक ठरत आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →