स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिस ठाणे यांची संयुक्त कारवाई
बसस्टँड येथे सोन्याचे दागिने चोरी करणार्या महिला आरोपीस ताब्यात घेतलेबाबत

*कोंकण एक्सप्रेस
*स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिस ठाणे यांची संयुक्त कारवाई
*बसस्टँड येथे सोन्याचे दागिने चोरी करणार्या महिला आरोपीस ताब्यात घेतलेबाबत
*सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी पोलिस ठाणे गु.र.नं. 253/2026, भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे सावंतवाडी बसस्टँड येथे 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झालेबाबत दिनांक 21/09/26 रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे समांतर तपासात CCTV footage व तांत्रिक विश्लेषणवरुण सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील महिला नामे संगीता सुभाष जाधव,वय 35 वर्षे,रा. संग्राम हॉटेलच्या मागे झोपडपट्टी, मंठा,जिल्हा जालना हिने केले असल्याचे निष्पन्न करण्यात आले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पथक यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत नमूद आरोपी महिलेस दिनांक 29/09/2026 रोजी मंठा,जिल्हा जालना येथून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.तिच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता तिने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.नमूद महिलेस सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पथकाच्या ताब्यात देण्यात आलेले असून तिच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने हस्तगत करीत आहोत.
सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे व पोलिस निरीक्षक श्री राजेंद्र मगदुम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ , ASI सुरेश राठोड, HC जॅकसन ghonsalvis,PC अमर कांडर तसेच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे API हर्षद हिंगे,PSI अविनाश पाटील,HC शिंदे,WPC गावकर यांच्या पथकाने केलेली आहे.
जाहिरातसावंतवाडी मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगशेकडो विद्यार्थ्यांसोबत एकाचवेळी बुद्धिबळाचा डाव

2 ऑक्टोबरला सावंतवाडीत महात्मा गांधी-लाल बहादूर शास्त्री जयंती व सत्कार समारंभ

दोडामार्ग,सावंतवाडीत हत्ती हटाव मोहीम राबविली नाही तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू

