फोंडाघाटच्या रुद्राक्ष राठोडची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

*कोंकण एक्सप्रेस
*फोंडाघाटच्या रुद्राक्ष राठोडची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
*फोंडाघाट : संजना हळदिवे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी कणकवली येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटचा विद्यार्थी रुद्राक्ष विजयकुमार राठोड याने १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची कोल्हापूर विभागीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रुद्राक्षने स्पर्धेत बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि अचूक डावपेचांचा प्रभावी वापर करत विजय मिळवला. त्याच्या या यशामुळे फोंडाघाट प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कु.रुद्राक्ष व त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.श्री.म.ज.सावंत, सेक्रेटरी मा.श्री.चं.शा.लिंग्रस, खजिनदार मा.श्री.वि.रा.तायशेटे, शाळा समिती चेअरमन मा.श्री.द.दि.पवार, मा.संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, पर्यवेक्षक श्री.व्ही.पी.राठोड, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगकणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला

कणकवली तालुक्यात जलसंवर्धन अभियान सुरू ; करंजेत वनराई बंधाऱ्याने शुभारंभ

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आरोही हंकारे तृतीय
ब्रेकिंग