बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला

अल्पवयीन हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचा केला होता प्रयत्न * राणेंच्या जिल्ह्यात "लव्ह जिहाद" खपवून घेणार नाही * कणकवली भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला इशारा

📅 १ ऑक्टोबर, २०२६👁 ५१ब्रेकिंग#नितेश राणे
कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी  ‘लव्ह जिहाद’चा डाव  उधळला

*कोंकण एक्सप्रेस

*कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला

*अल्पवयीन हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचा केला होता प्रयत्न

* राणेंच्या जिल्ह्यात "लव्ह जिहाद" खपवून घेणार नाही

* कणकवली भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला इशारा

*कणकवली : प्रतिनिधी

अल्पवयीन हिंदू धर्मीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी विवाह करण्याचा मुस्लिम युवकाचा लव्ह जिहादचा प्रयत्न भाजपा पदाधिकात्यांनी कणकवलीत हाणून पाडला. त्या मेहबूब जैनुद्दीन लदाफ (वय २७) या मुस्लिम युवकाने तिला प्रेमाच्या मोहात पाडून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. ती अल्पवयीन मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिच्याशी लग्नाबाबत जिल्हा निबंधक कार्यालयात विवाह नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहीती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडे सदर युवतीच्या कुटुंबियांनी तक्रार केली. त्यानुसार सदर विवाह लव्ह जिहादचा प्रकार असल्याने तो उधळल्याची माहीती कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक राकेश राणे यांनी दिली. तर राणेंच्या जिल्हा असले घाणेरडे प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

कणकवली येथील खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक स्वप्नील राणे,मेघा सावंत, मनस्वी मिथुन ठाणेकर, आर्या औदुंबर राणे, प्रतिक्षा सावंत, महेश सावंत, औदुंबर राणे उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे हिंदू समाज रक्षणासाठी राज्यभर काम करत आहेत. हिंदू समाजाच्या विविध प्रश्नांवर ते आवाज उठवत आहेत. कणकवलीतील हा लव्ह जिहादचा प्रकार आमच्याकडे पीडित युवतीच्या कुटुंबियांनी सांगितला. विवाहासाठी मुस्लिम तरुण मेहबूब जैनुद्दीन लदाफ याने जिल्हा निबंधक कार्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र या विवाहास सदर हिंदू युवतीचा विरोध होता. तरी देखील जबरदस्तीपणे हा विवाह करण्याचा मेहबुबचा प्रयत्न सुरु होता. त्या युवतीच्या कुटुंबियांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातुन आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारातील मुस्लिम तरुणाला योग्य त्या पद्धतीने समज दिल्यानंतर त्याने जिल्हा निबंधक कार्यालयाकडे दिलेला अर्ज मागे घेतला.आणि पुन्हा असे कृत्य करणार नाही असे लेखी दिले. लव्ह जिहादच्या प्रकारात अडकलेल्या त्या युवतीला बाहेर काढण्यात आम्हाला यश आले आहे. यापुढील काळात हिंदू युवतींना जर कोण मुस्लिम समाजातील तरुण फसवत असेल तर भाजपा गप्प बसणार नसल्याचा इशारा नगरसेवक राकेश राणे यांनी दिला आहे..

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →