गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• चाफेड गावात स्वतंत्र पोस्ट आणि तलाठी कार्यालय सुरु झाल्याने गावाची विकासाकडे झेप ; सभापती गणेश राणे• कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला• खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार• सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ आपत्तीबाबत सात ठिकाणी रंगीत तालीम• DigitP’च्या जाचातून जांभा चिरेखाण व्यवसायाला वगळण्याची मागणी!• नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला• दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश• चाफेड स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा 1 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ• नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम• २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस• चाफेड गावात स्वतंत्र पोस्ट आणि तलाठी कार्यालय सुरु झाल्याने गावाची विकासाकडे झेप ; सभापती गणेश राणे• कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला• खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार• सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ आपत्तीबाबत सात ठिकाणी रंगीत तालीम• DigitP’च्या जाचातून जांभा चिरेखाण व्यवसायाला वगळण्याची मागणी!• नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला• दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश• चाफेड स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा 1 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ• नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम• २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आरोही हंकारे तृतीय

📅 १ ऑक्टोबर, २०२६👁 ५
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आरोही हंकारे तृतीय

*कोंकण एक्स्प्रेस

*राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आरोही हंकारे तृतीय

*‘महाराणी ताराबाई भोसले’ विषयावरील निबंधासाठी मिळविला बहुमान

*कणकवली : प्रतिनिधी

जवाहर नवोदय विद्यालय, सावंतवाडी येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या कु. आरोही श्रीकांत हंकारे हिने लाख मराठा प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेसाठी ‘महाराणी ताराबाई भोसले’ हा विषय देण्यात आला होता. राज्यभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. आरोही हिने विषयाचा अभ्यासपूर्ण व प्रभावी पद्धतीने वेध घेत निबंधाची मांडणी केली. तिच्या या लेखनाची दखल घेत तिला राज्यस्तरावर तृतीय क्रमांक देण्यात आला.

या यशाबद्दल आरोहीचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व धनादेश देऊन गौरव करण्यात आला. लाख मराठा प्रतिष्ठान, नाशिकचे अध्यक्ष चंद्रकांत बांकर तसेच अशोक दुधारे यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.

आरोहीला या स्पर्धेसाठी तिचे पालक तसेच प्राध्यापक डॉ. विजय गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे आरोहीने राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.

आरोहीच्या या यशाबद्दल तिचे पालक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच परिसरातून अभिनंदन होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →