गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• चाफेड गावात स्वतंत्र पोस्ट आणि तलाठी कार्यालय सुरु झाल्याने गावाची विकासाकडे झेप ; सभापती गणेश राणे• कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला• खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार• सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ आपत्तीबाबत सात ठिकाणी रंगीत तालीम• DigitP’च्या जाचातून जांभा चिरेखाण व्यवसायाला वगळण्याची मागणी!• नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला• दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश• चाफेड स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा 1 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ• नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम• २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस• चाफेड गावात स्वतंत्र पोस्ट आणि तलाठी कार्यालय सुरु झाल्याने गावाची विकासाकडे झेप ; सभापती गणेश राणे• कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा डाव उधळला• खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार• सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ आपत्तीबाबत सात ठिकाणी रंगीत तालीम• DigitP’च्या जाचातून जांभा चिरेखाण व्यवसायाला वगळण्याची मागणी!• नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला• दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश• चाफेड स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा 1 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ• नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम• २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात जल अर्पण दिवस

DigitP’च्या जाचातून जांभा चिरेखाण व्यवसायाला वगळण्याची मागणी!

*भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी आमदार प्रमोद जठार यांचे महसूलमंत्र्यांना निवेदन *पूर्वीची छापील पास पद्धत सुरू करण्याची आमदार जठार यांची आग्रही मागणी *मुंबई

📅 १ ऑक्टोबर, २०२६👁 १०ब्रेकिंग
DigitP’च्या जाचातून जांभा चिरेखाण व्यवसायाला वगळण्याची मागणी!

*कोंकण एक्सप्रेस

*DigitP’च्या जाचातून जांभा चिरेखाण व्यवसायाला वगळण्याची मागणी!

*भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी आमदार प्रमोद जठार यांचे महसूलमंत्र्यांना निवेदन

*पूर्वीची छापील पास पद्धत सुरू करण्याची आमदार जठार यांची आग्रही मागणी

*मुंबई

कोकणातील पारंपरिक जांभा चिरेखाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १.५ लाख लोकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रश्नावर आमदार प्रमोद जठार यांनी आज राज्याचे महसूलमंत्री मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन जांभा चिरेखाण व्यवसायाला ‘DigitP’ ऑनलाइन पास प्रणालीमधून पूर्णपणे वगळावे आणि पूर्वीप्रमाणे छापील पास पद्धत पुन्हा सुरू करावी, अशी ठोस मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.

कोकणातील जांभा दगडाचा व्यवसाय हा अनेक वर्षांपासून स्थानिकांच्या रोजगाराचे आणि उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, यावर्षी गौण खनिज वाहतुकीसाठी ‘DigitP’ ऑनलाइन पास प्रणाली अनिवार्य करण्यात आल्याने जांभा चिरेखाण व्यावसायिकांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोकणची भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता ऑनलाइन प्रणालीच्या तांत्रिक अटी लागू झाल्याने हा पारंपरिक व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचे जठार यांनी महसूलमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

जांभा चिऱ्याच्या खाणी प्रामुख्याने वस्तीपासून दूर असलेल्या दुर्गम डोंगरमाथ्यांवर व सड्यांवर आहेत. या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने उत्पादनाच्या ठिकाणी ऑनलाइन पास जनरेट करणे शक्य होत नाही. त्याचबरोबर ‘DigitP’ प्रणालीसाठी महाखनिज पोर्टलवर नोंदणीकृत असलेला खाणमालकाचा मोबाईल क्रमांक खाणीवर कायम ठेवणेही व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, कोकणातील ग्रामीण भागात जांभा चिऱ्याची वाहतूक प्रामुख्याने स्थानिक छोट्या व भाड्याच्या वाहनांद्वारे केली जाते. या वाहनांवर GPS प्रणाली उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाइन पास काढताना तांत्रिक अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी शासनाची ऑनलाइन व्यवस्था आणि कोकणातील प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थिती यांच्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे.

“ऑनलाइन प्रणालीच्या तांत्रिक अटींमुळे कोकणातील पारंपरिक जांभा चिरेखाण व्यवसाय अडचणीत आला आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गरिबांची चूल पेटती राहण्यासाठी कोकणातील जांभा चिरेखाण व्यवसायाला ‘DigitP’ प्रणालीतून पूर्ण सवलत देऊन पूर्वीची छापील पास पद्धत सुरू करावी,” अशी आग्रही भूमिका आमदार प्रमोद जठार यांनी मांडली.

यावेळी जांभा चिरा खाण मालक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गंभीर प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

कोकणच्या भूमिपुत्रांचा पारंपरिक व्यवसाय, रोजगार आणि उपजीविका वाचवण्यासाठी शासन दरबारी हा प्रश्न ठामपणे लावून धरू, अशी भूमिका आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी स्पष्ट केली.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मुंबई मधील अधिक बातम्या

अधिक पहा →