11 वीची ‘सीईटी’ परीक्षा रदद..!

11 वीची ‘सीईटी’ परीक्षा रदद..!

*कोकण Express*

*11 वीची ‘सीईटी’ परीक्षा रदद..!*

दि. २१ ऑगस्ट रोजी कनिष्ठ महाविद्यालयाकडुन प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार होते. सदरची परीक्षा पूर्णपणे एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी अधिसूचना २८ मे रोजी काढण्यात आली होती. यावर निकाल देत हायकोर्टाने ही अधिसूचना रद्द केली आहे. याचबरोबर पुढील सहा आठवड्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाकडुन देण्यात आले आहेत. कोरोनाच्या परिस्थीतीमध्ये परीक्षा घेणे हे मुलांसाठी धोक्याचे आहे. असे उच्च न्यायालयाने सांगीतले आहे. या परीक्षेसाठी १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

‘अनन्या पत्की’ या विध्यार्थीनिने याविषयी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याची सुनावणी न्या. आर. डी. धानुका व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे झाली. ‘सीईटी’ बेकायदा ठरवण्यात आली तर काय होईल? असा प्रश्न न्यायालयाने याआधीच्या सुनावणीदरम्यान उपस्थित केला होता.

याविषयी न्यायालयाने विचारणा केली, की राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे. यावर सरकार काय व्यवस्था करणार आहे ? कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या घरानजीकचे परीक्षा केंद्र देण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ते कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. शेवटी न्यायालयाने सर्वांचा युक्तिवाद ऐकल्यावर आज हा निकाल दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!