*कोकण Express*
*अतिवृष्टी मुळे कणकवली वागदे कसवण तळवडे रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेल्या रस्ता गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती करा- नगरसेवक अबिद नाईक*
*तात्काळ दुरुस्थी साठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन स्वतः केली पहाणी…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जुलै 2021 रोजी अतिवृष्टि मुळे कणकवली तालुक्यातील वागदे कसवण तळवडे रस्ता प्राजिमा 31 किमी 2/500 येथे भूसंखलन होउन रस्त्याच्या मधोमध चार फुट खोल एव्हढा भाग खचला व रस्ता वाहतूकिला बंद झाला परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागने तात्पुरत्या स्वरुपाचा रस्ता तैयार करुण छोट्या वाहनांना वाहतुकीला मोकला केला परंतु एसटी वाहतूक बंद असल्यामुळे त्या पंचक्रोशीतील लोकांना येण्याजान्या साठी खुप त्रास सहन करावा लागत आहे
त्याचबरोबर गणेश चतुर्थी हा सन जवळ आल्यामुळे एसटीची वाहतूक चालू होने गरजेचे आहे त्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर विनायक जोशी व जूनियर इंजिनियर राहुल पवार यांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी भूसंख्लन झालेल्या रस्त्याची पाहणी केली व अधिकाऱ्यांना येणाऱ्या आठ दिवसात एसटी वाहतूकीला रस्ता मोकळा झाला पाहिजे त्यासाठी लागणारी सर्व मदत आपण करू असे अबिद नाईक यांनी सांगितले मागील दोन वर्षापासून रस्ता खचन्याचा प्रकार चालू असून त्यावर बांधकाम विभागने लक्ष देने गरजेचे होते हे सबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले अधिकाऱ्यांनी आपण एसटी वाहतूकिला आठ दिवसात रस्ता मोकळा करुण देण्याचे आश्वाशीत केले त्याचबरोबर ह्या डोंगरी रस्त्याच्या खचलेले काम लवकर होण्यासाठी उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब पालकमंत्री ना. उदयजी सामंत साहेब सार्वजनिक बांधकाम कैबिनेट मंत्री ना. अशोक चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तामामा भरने साहेब यांच्या कड़े पाठपुरवा करणार असल्याचे अबिद नाईक यांनी सांगितले
पाहणी करताना राष्टवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर विनायक जोशी जूनियर इंजिनियर राहुल पवार माजी राष्ट्रवादीकणकवली तालुका अध्यक्ष विलास गावकर माजी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत कसवण सरपंच सौ गीता तेली माजी राष्ट्रवादी जिल्हा ग्राहक सवारंक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे माजी शिवडाव उपसरपंच सतीश पाताडे कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़ सचिन सदडेकर कणकवली राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर शहर सरचिटणीस गणेश चौगुले विशाल ठाणेकर राजू वरदम बालू मेस्त्री अंकुश मेस्त्री अरविंद पालव बाबी गावकर महेन्द्र गावकर आदि उपस्थित होते.