कोकणातील वसुली करणारा वाझे’ म्हणजेच किरण सामंत; आम.नितेश राणे

कोकणातील वसुली करणारा वाझे’ म्हणजेच किरण सामंत; आम.नितेश राणे

*कोकण Express*

*कोकणातील वसुली करणारा वाझे’ म्हणजेच किरण सामंत; आम.नितेश राणे*

*कणकवली विधानसभा मतदारसंघातील १६९ सरपंचांना १३ रोजी विमा कवच वितरण!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोरोना संकटात जिल्ह्यातील सरपंचानी जीवाची पर्वा न करता काम केले.त्या सरपंचांना विमा देण्यासाठी राज्य सरकारने दुर्लक्ष केलं,त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले.पण तिसरी लाट आली तरी अद्याप विमा दिला नाही. त्यामुळे पुढील एक वर्षासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघातील १६९ सरपंचांना विमा मी जाहीर केल्याप्रमाणे १३ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते विमा संरक्षण पॉलिसीचे वाटप करण्यात येईल अशी माहिती आम.नितेश राणे यांनी दिली.

कणकवली येथे पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.आम.नितेश राणे म्हणाले ,पालक असलेले व व्यावसायिक असलेल्या उदय सामतांना सरपंचांना विमा देता आला नाही.राजन साळवी व जिल्ह्यातील कडवट शिवसैनिकांना डावलण्याचे काम चालू आहे.पालकमंत्र्यांच्या भावाचा प्रशासनात हस्तक्षेप, मच्छिमारांकडून हप्तेगिरी वाढली आहे.कोकणातील वसुली करणारा वाझे…म्हणजेच किरण सामंत असल्याचा घणाघाती आरोप भाजपा आ.नितेश राणे यांनी केला.

सरपंच कोरोना लढाई लढत असताना महाराष्ट्र सरकार त्याला कुठलाही आधार आणि सुरक्षा दिली गेली नाही. एका बाजूला कोरोनाच्या विरुद्ध लढाईमध्ये शासनाकडून एक रुपयाची मदत नाही. गावाला सुरक्षित ठेवणाऱ्या सरपंचाला मुख्यमंत्री आधार देऊ शकले नाहीत.अनेकदा सरपंच संघटनानी पालकमंत्र्यांकडे मागणी केली,अद्याप विमा सरपंचांना नाही.

कोरोना लढाईमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सरपंच लोकांना लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करताना आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.त्यांचे नातेवाईक पॉझिटिव्ह झालेले आहेत.यामध्ये या दोन्ही लाटांमध्ये काही आपले सरपंच दगावले आहेत.गावातील लोकांची सेवा करण्याचे काम सरपंच करत आहेत.

पालकमंत्री, तुम्ही दिलेला शब्द हा पूर्ण करण्यास तुम्हाला का अवघड झाले? जिल्हा परिषद सदस्य फोडण्यासाठी २५-३० लाख यांच्याकडून दिले जात होते. तर पालकमंत्र्यांकडून पक्षांतरासाठी पैसे दिले जातात,मात्र विमा सरपंचांना दिला जात नाही.पालकमंत्री यांचा भाऊ किरण सामंत यांचा जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे. या पद्धतीत काळापैसा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये म्हणून वापरला जातो.हप्तेगिरीचा पैसा येतो कुठून?काही व्हिडीओ क्लिप आमच्याकडे आहे.काही पुरावे आमच्याकडे आहेत?त्याची तक्रार इनकम टॅक्स व ईडीकडे करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!