ग्रामपंचायत तोंडवली बावशी सरपंचा विरोधात तोंडवली बोभाटेवाडी नळधारक ग्रामस्थ आक्रमक व ग्रामपंचायत ला घेरावा

ग्रामपंचायत तोंडवली बावशी सरपंचा विरोधात तोंडवली बोभाटेवाडी नळधारक ग्रामस्थ आक्रमक व ग्रामपंचायत ला घेरावा

*कोकण  Express”

*ग्रामपंचायत तोंडवली बावशी सरपंचा विरोधात तोंडवली बोभाटेवाडी नळधारक ग्रामस्थ आक्रमक व ग्रामपंचायत ला घेरावा*

*ग्रामपंचायतीत मनमानी कारभार केल्यास महागात पडेल असा इशारा*

ग्रामपंचायत तोंडवली बावशी ग्रामपंचायत सरपंच यांच्याविरोधात तोंडवली बोभाटेवाडी येथील नळ धारक ग्रामस्थ यांनी आज आक्रमक भूमिका घेतली कारण दिनांक ०३/०८/२०२१ रोजी नळ कामगार सुनिल पवार यांच्याविरोधात नळधारक ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारची हरकत नसते वेळीसुद्धा फक्त राजकीय हेतू साधून नळ धारकास कामावरून काढण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत सरपंच सौ मनाली गुरव व इतर सदस्य यांनी प्रयत्न केला तसेच २२/०७/२०२१ रोजी मासिक सभेमध्ये कोणत्याही नळ धारकाची लेखी अथवा तोंडी तक्रार नसते वेळीसुद्धा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कामगारांच्या विरोधात ठराव घेण्यात आला त्या ठरावात सूचक अशोक बोभाटे व अनुमोदक गौरांगी बोभाटे व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी चुकीच्या पद्धतीने ठराव मंजूर केला या ठरावात बावशी ग्रामपंचायत सदस्य सौ मनश्री कांडर यांनी विरोध केलेला असून बाकीच्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ६/१ असा ठराव घेऊन आपला हेतू साध्या केला व चुकीच्या पद्धतीने ठराव मंजूर केला याच्या विरोधात आज दिनांक१०/०८/२०२१ रोजी सदर तोंडवली बोभाटे वाडी मधील नळ धारक महिला व पुरुष एकत्र येऊन या गोष्टीचा जाब सदर उपसरपंच सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना विचारला त्यावेळेस यांच्यामध्ये बोलण्यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ दिसून आला नाही सर्वजण एका माका जवळ बोट दाखवत आरोप करत होते परंतु उपसरपंच अशोक बोभाटे यांनी सदर ग्रामस्थांना समोर जाहीर केले की या ठरावास माझा विरोध आहे असे मत मांडले परंतु या सर्वांमध्ये एकमत नसल्याचे दिसून आले परंतु ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका बघून सदर सरपंच मनाली गुरव उपसरपंच अशोक बोभाटे ग्रामपंचायत सदस्य यांनी नरमाईची भूमिका घेऊन आपली चूक मान्य करून सदर तोंडवली बोभाटेवाडी नळ धारक ग्रामस्थांना लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले सदर पत्रात उल्लेख करण्यात आला की श्री सुनिल पवार नळ कामगार यांनाच कायम कामावर ठेवण्यात येईल व भविष्यात नळ कामगार विरोधात ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यास मासिक सभेमध्ये चर्चा करून नंतर पूर्ण अधिकार ग्रामसभेला देण्यात आला व ग्रामस्थांचे बहुमत असेल त्या पद्धतीचा निर्णय घेण्यात येईल असे लेखी पत्र सरपंच व ग्रामसेवक यांनी तोंडवली बोभाटे वाडी नळ धारक ग्रामस्थांना देण्यात आले यावेळेस तोंडवली बोबाटे वाडी मधून जास्तीत जास्त ग्रामस्थ उपस्थित होते व ग्रामस्थांनी यानंतर ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार केल्यास महागात पडेल असा इशारा दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!