*कोकण Express*
*देवगड येथील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज देवगड येथील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या उपस्थितीत आज जाहीर प्रवेश केला. तर देवगड संपर्क अध्यक्षपदी दिनेश झोरे तालुकाध्यक्षपदी राकेश मिराशी शहराध्यक्षपदी पुरुषोत्तम जाधव आदींची निवड करण्यात आली आली व त्यांच्या सहित नितेश कोकरे, वैभव आचरेकर, धीरज वाडेकर, भरत तोरस्कर, हेमंत जाधव, विशाल गोळवणकर, शशांक बिर्जे, मयुरेश बांदकर, यश मुणगेकर, आदित्य कदम, आशिष साईम, हर्षद वाडेकर, अमेय गोळवणकर, प्रवीण गोळवणकर, सुभाष जोईल, ऑफिस मोमीन, हर्षद तेली आदी युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला तर पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करू देवगड पक्ष हिताचे काम करू असे प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी विशाल माड्ये तालुका उपाध्यक्ष वेंगुर्ला ओंकार मेस्त्री पंचायत समिती विभाग अध्यक्ष माणगाव प्रथमेश ठाकूर मनवीसे शाखा अध्यक्ष नेरूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.