*कोकण Express*
*जामदा पूल धोकादायक;दुर्लक्ष केल्यास महाड येथील सावित्री पूलाची होऊ शकते पुनरावृत्ती…*
*वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
या पूलाला तब्बल पन्नास वर्ष पुर्ण झाली आहेत. पूलाचे संरक्षण कठडे ढासळले आहेत. तर स्लँबला तडे गेले आहेत. दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीत हा पूल पाण्याखाली जातो. या पूलाला सात खांब आहेत. तर पुलाची उंची अंदाजे पाच ते सहा मीटर इतकी आहे. हा पूल खारेपाटण-गगनबावडा मार्गावरती आहे. राजापूर तालुक्यातील मठखुर्द हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत असून. त्या गावातील ग्रामस्थांना शासकीय कामासाठी राजापूर व केळवली याठिकाणी जाण्यासाठी याच पूलावरून ये -जा करावी लागते. या पूलावरील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दोन वर्षापूर्वी महाड येथील सावित्री पूल महापुरात वाहून गेला होता. अचानक पुल वाहून गेल्याने दोन एसटी बस देखील पूलावरून कोसळत वाहून गेल्या होत्या. काळीज पिळवटून टाकणारी मोठी दुर्घटना घडली होती. जामदा पूलाकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास सावित्री पुलाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.पुढील धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकामने पुलाबाबत तात्काळ पावले उचलावीत. या पुलावरून होणारी अवजड वाहतूक थांबवावी व पूलाची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी नासीर काझी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.