शिवसेनेचे कणकवली शहरात शिवसंपर्क अभियान

शिवसेनेचे कणकवली शहरात शिवसंपर्क अभियान

*कोकण Express*

*शिवसेनेचे कणकवली शहरात शिवसंपर्क अभियान…!*

*शिवसेनेचे नेते राहणार उपस्थित…!*

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम…!*

*कणकवली ः संजना हळदिवे* 

शहरात शिवसेनेचे नेटवर्क स्टॉग करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी कंबर कसली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून शहर शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम व 17 प्रभागांमध्ये शिवसंपर्क अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत शहरात पक्षाच्या संघटनेची बांधणी केली जाणार आहे.

मंगळवार 27 जुलै रोजी कणकवली शहर शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कणकवली स्वयंभू मंदिर येथे सकाळी 8 वा. दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते हा दुग्धाभिषेक होणार असून यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत व शिवसेना पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व खा. विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या माध्यमातून कणकवली शहरात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार आहे. 17 प्रभागांत शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच अतुल रावराणे यांच्या माध्यमातून मोफत छत्री वाटप व भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील शेतकर्‍यांना मोफत काजू कलमाचे वाटप देखील केले जाणार आहे.

कणकवली शिवसेनेमार्फत शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ 27 जुलै रोजी सायंकाळी 4 वा. करण्यात येणार आहे. शिवसंपर्क अभियान प्रभाग निहाय यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली. नाथ पै नगर, एसटी कॉलनी योगेश मुंज, शाळा नंबर 5 नगरसेवक रुपेश नार्वेकर, परबवाडी भिवा परब. शिवाजीनगर सोहम वाळके. मेघन मुरकर, गुरु नाईक. कनकनगर बाबु जाधव. बांधकरवाडी रवी राणे. सुमित राणे. वरचीवाडी साक्षी आमडोसकर, राकेश पिळणकर. बिजलीनगर नगरसेवक सुशांत नाईक, प्रतीक्षा साटम. वार्ड नंबर 1 तेजस राणे. बौद्धवाडी भाई जाधव, महेश राणे. बाजारपेठ सुनील पारकर. बाजारपेठ प्रसाद अंधारी, आदित्य सापळे. हर्णे आळी गौरव हर्णे. टेंबवाडी वैभव मालडकर. गंगोवाडी भूषण परुळेकर, विलास कोरगावकर. सोनगेवाडी सुजित जाधव, संतोष पुजारे. विद्यानगर नगरसेवक कन्हैया पारकर, अश्विनी मोर्ये. या अभियानावेळी शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नगरसेवक गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, शहरप्रमुख शेखर राणे यांनी केले आहे.

लसीकरणाची माहिती संकलित करणार…!

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने कणकवली शहरातील 17 प्रभागांमध्ये आतापर्यंत नागरिकांना झालेल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. तसेच जे नागरिक अजून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर लसीकरण करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!