*कोकण Express*
*नीट परीक्षा केंद्र मंजूर; केंद्रीय मंत्री नाम.नारायण राणे यांचा अभिनंदनाचा ठराव कणकवली पंचयत समिती बैठकीत मंजूर*
*पालकमंत्री, शिवसेना खासदार यांच्या अभिनंदन ठरावाला मिलिंद मेस्त्री यांचा आक्षेप*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
एक निवेदन दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली अशा प्रवृत्तीचा अभिनंदनाचा ठराव घेता येणार नाही.नीट परीक्षा केंद्रासाठी केंद्रात मंत्री होताच नाम.नारायण राणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना सांगून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात नीट केंद्रे मंजूर केली.त्यामुळे नामदार नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करा अशी मागणी सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी कणकवली पंचायत समितीच्या मासिक सभेत केली.सभापती मनोज रावराणे यांनी ठराव सर्वानुमते मंजूर केला.दरम्यान मंगेश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांचा मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरवावरून मिलिंद मेस्त्री यांनी विरोधी सदस्य मंगेश सावंत यांना फैलावर घेतले.
कणकवली पंचायत समितीची सर्वसाधारण बैठक सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पंचायत समितीच्या प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात घेण्यात आली. या बैठकीच्या सुरुवातीलाच अभिनंदन ठराव मांडत असताना पंचायत समितीचे सदस्य मंगेश सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीट परीक्षा केंद्र मंजूर झाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र या ठरावाला सत्ताधारी गटाचे सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी जोरदार आक्षेप घेतला. पालकमंत्री व खासदार यांनी गतवर्षी पत्र दिले होते.मात्र केंद्रात मंत्री होताच नाम.नारायण राणे यांनी शिक्षण मंत्र्यांना सांगून हे केंद्र मंजूर केले आहे. असे सांगून श्री. मेस्त्री यांनी श्री. सावंत यांनी मांडलेल्या ठरावाला हरकत घेतली.