*कोकण Express*
*मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या वतीने ४००० जायफळ कलमांचे वाटप*
*कणकवली ः संजना हळदिवे*
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या वतीने ४००० जायफळ कलमांचे वाटप होणार आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्याकडून मोफत जायफळ कलमांचा वाटपाचा शुभारंभ आज रविवार दि. २५ जुलै, २०२१ रोजी दुपारी १२.३० वा. ग्रामपंचायत कार्यालय बीडवाडी सभागृह येथे झाला. तसेच कार्यक्रमामध्ये गुणवंत मुलांचा सत्कार व पुरामध्ये नुकसान झालेल्या मणचेकर कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. यावेळी सावंत साहेबांनी उपस्थित शेतकऱ्यांना जायफळ लागवडीचे मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख निसार शेख, उपतालुकाप्रमुख भालचंद्र दळवी, सरपंच सुदाम तेली, माजी चेअरमन दादा भोगले, उपसरपंच बावकर, पोलीस पाटील नामदेव राणे, शाखाप्रमुख पांडुरंग मगर, उमेश लाड, नाना खादारे, रामचंद्र घाडी,विश्राम लाड, लवु राणे, प्रसाद राणे, सोनू चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जायफळ कलमांचे वाटप झाले.