*कोकण Express*
*कणकवली भाजपा महिला मोर्चाच्यावतीने नवदुर्गांचा केला सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना काळात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या नवदुर्गांचा सत्कार भारतीय जनता पक्षाच्या कणकवली महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आला.यात असलदे वृद्धाश्रम प्रमुख सौ.दिपिका रांबाडे, महिला पोलीस अधिकारी धनश्री पाटील,ममता जाधव,रोटरी अध्यक्ष दिशा अंधारी, नर्स नयना मुसळे,प्रगतशील शेतकरी आशा पाटील,आध्यात्मिक गुरू संध्या दिदी ब्रह्मकुमारी,अंगणवाडी सेविका पदाधिकारी आश्विनी सुर्वे ,शीतल सावंत.या विविध क्षेत्रात कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
हा सत्कार भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेर्से यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कणकवली महिला अध्यक्षा सौ.हर्षदा वाळके, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.प्रज्ञा ढवण,जिल्हा कार्यकारिणी सदस्या व पं.स.सदस्या सौ.भाग्यलक्ष्मी साटम, सौ.रेखा काणेकर, सौ.स्वाती राणे, कणकवली शहर अध्यक्षा सौ.प्राची कर्पे, कणकवली नप बांधकाम सभापती सौ.मेघा गांगण, महिला बालकल्याण सभापती सौ.प्रतिक्षा सावंत, नगरसेविका सौ.मेघा सावंत, सौ.सदडेकर, तसेच सर्व सन्माननीय विविध क्षेत्रातील नवदुर्गा तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते.