*कोकण Express*
*देवगड नगरपंचायतमध्ये आमदार नितेश राणेंना धक्का*
*भाजपाचे 3 नगरसेवक शिवबंधनात*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
देवगड नगरपंचायतचे भाजपचे विद्यमान नगरसेवक विकास कोयंडे, नगरसेविका हर्षा ठाकूर, श्रुती जाधव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबई येथे पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवबंधन बांधून तिनही नगरसेवकांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे देवगड मध्ये नारायण राणे व नितेश राणेंना शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली विकासकामे लक्षात घेता शिवसेनाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करू शकते. त्यामुळेच आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्या नगरसेवकांनी सांगितले. अजून काही नगरसेवक शिवसेनेत येण्यास इच्छुक असून खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, अतुल रावराणे यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणुकीत देवगड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा विश्वास यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केला