*कोकण Express*
*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन नगराध्यक्ष संजू परब आणि सहकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सहकार्यांनी शनिवारी दिल्लीत जावून केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून सावंतवाडी शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी केली.
यावेळी भाजपचे सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा सरपंच अक्रम खान, भाजपचे युवा नेते विशाल परब, मकरंद तोरसकर, माजी नगरसेवक गुरू मठकर, केतन आजगांवकर, अमित परब, अॅड. अनिल निरवडेकर, बंटी पुरोहीत आदी उपस्थित होते . यावेळी सावंतवाडीचे माजी नगरसेवक तथा भाजपचे शहर उपाध्यक्ष गुरुदास मठकर यांनी ना. राणे यांना चांदीची गणेश प्रतिमा भेट दिली.
तसेच बांदा सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर यांनीही श्री देव बांदेश्वराची प्रतिमा त्यांना भेट देत चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो युवक गोवा राज्यातील छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये नोकरी करण्यासाठी जात असतात. मात्र, त्यांना आपल्या जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध व्हावा अशी मागणी अक्रम खान यांनी यावेळी केली.
या चर्चेवेळी केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांनी जिल्ह्यातील गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या या युवकांसाठीच आपण राज्याचे उद्योगमंत्री असताना आडाळी एमआयडीसीची मुहूर्तमेढ रोवली होती. आता केंद्रीय उद्योग मंत्री या नात्याने बांदा ते दोडामार्ग या परिसरात औद्योगिक कॉरिडॉर विकसित करण्याचा आपला मानस असून त्याला नक्कीच चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. त्यावेळी संजू परब यांच्यासह अक्रम खान व सहकाऱ्यांनी ना. राणे यांचे आभार मानले.