*कोकण Express*
*गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना तालुका पत्रकार संघाच्या वतीने वाहिली श्रद्धांजली….!*
*पत्रकार मित्रांनी दिला आठवणींना उजाळा…!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
महाराष्ट्रातील जेष्ठ गझलकार, कवी व पत्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नानिवडे गावचे सुपुत्र कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या दुःखद निधनाबद्दल कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने कणकवली येथे शोकसभा आयोजित केली होती. यावेळी त्याच्या आठवणींना उजाळा देऊन पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.
तत्पूर्वी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी कै. नानिवडेकर याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य रमेश जोगळे, सुधीर राणे, जेष्ठ पत्रकार काका करंबेळकर, भाई चव्हाण, तालुका सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम, माजी अध्यक्ष संतोष राऊळ, अजित सावंत, लक्ष्मीकांत भावे, भगवान लोके, विरेंद्र चिंदरकर, रंजिता तहसीलदार, तुषार हजारे, गणेश पारकर, सचिन राणे, आनंद तांबे, राजन चव्हाण, अनिकेत उचले आदी पत्रकार उपस्थित होते.
शोकसभेत बोलाताना श्री जेठे म्हणाले की, साहित्यिक आणि पत्रकार याचे जवळचे नाते असते साहित्यिकातून अनेक पत्रकार घडले त्यामधील नानिवडेकर हे एक होते. त्यामुळेच आज साहित्यिक व पत्रकार श्रेत्रात त्याच्या अकाली जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे.पत्रकारांच्या कार्यक्रमाला नानिवडेकर हे कायमच उपस्थित राहयचे यामुळे त्याची आठवण कायमच येत राहिल.
पुढे श्री.काका करंबेळकर म्हणाले की, कै. नानिवडेकर जाणे हे आजही अविश्वसनीय आहे.सुरेश भटांचा वारसा उत्तमपणे सांभाळताना त्याची गझल मनाला पटणारी होती.त्यामुळे आत्मीयता वाटायची आजवर अनेक माणसे जोडली मात्र त्यानी कुणालाही शब्दांनी दुखावली नाही असे सांगीतले. तर श्री. देसाई यानी हा दु:खत कार्यक्रम आहे.मात्र नानिवडेकर याच्या शब्दांची श्रीमंतीची तुलना होणे नाही.ज्याप्रमाणे त्याना व्यासपीठ व प्रसिद्धी मिळाली पाहीजे होती ती संधी त्यांना मिळालेली नाही.मात्र त्याच्या कुटुंबियांना आपल्या पत्रकार संघाच्यावतीने मदती बरोबर शासकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य रमेश जोगळे, माजी अध्यक्ष संतोष राऊळ, भगवान लोके,अजित सावंत, जेष्ठ पत्रकार भाई चव्हाण यानी त्याच्या आठवणींना उजाळा देत शोकव्यक्त केला.त्याचबरोबर फोंडाघाट येथील पत्रकार सचिन नारकर, पत्रकार नितीन सावंत याचे वडील, संजय खानविलकर याचे वडील व गणेश पारकर याच्या आई यांनाही पत्रकार संघाच्यावतीने निधनाअंती श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच कै. नानिवडेकर याच्या कुटुंबाला तालुका पत्रकार संघाच्या वतीने जास्तीत जास्त तातडीची मदत देऊन शासनस्तरावर जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी खजिनदार नितीन कदम यांनी आभार व्यक्त केले.