संचयणीी घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना पैसे परत करा ; माजी खासदार किरीट सोमय्या

संचयणीी घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना पैसे परत करा ; माजी खासदार किरीट सोमय्या

*कोकण Express*

*संचयणीी घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना पैसे परत करा ; माजी खासदार किरीट सोमय्या*

संचयनी फायनान्सच्या कोकणातील अनेक गुंतवणूकदारांनी मला पुन्हा संपर्क केला आहे. आपल्या ठेवी मिळाव्याय यासाठी ते आग्रही आहेत. त्यामुळे मी दिल्लीला जाऊन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट घेतली. काही वर्षांपूर्वी मीच मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.त्यानुसार केंद्रसरकर, रिझर्व्ह बँक, राज्य सरकार यांनी पावले उचलून संचयनी प्रकरणातील दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठोस पावले उचलून संचयनी प्रकरणातील अनेकांची अटक झाली होती.मालमत्ता जप्त झाली होती.मात्र ही मालमत्ता विकून ठेवीदारांच्या ठेवी परत करणे गरजेचे होते त्यांनतर च्या काळात या कामात फारच ढिलाई आली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाला गती मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
या संचयनी मधील काही आरोपींना अटक झाली आहे तर काहींना अटक व्हायची आहे.काही आरोपींकडून मालमत्ता जप्त होण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिलेली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींन कडील मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केला जावा.आणि ठेवीदारांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र पोलीस यांच्यावरही महत्वाची जबाबदारी येणार आहे त्यामुळे मी पोलीस अधिकाऱ्यांना ही भेटणार आहे.काही आरोपी सिंधुदुर्ग कोकण या परिसरात आहेत,त्यांनी मोठ्याप्रमाणात सचंयनीतील पैशातून मालमत्ता केली आणि ती लपवली आहे.त्याचा शोध घेऊन अशा मालमत्तेचे हस्तांतरण व्हावे,त्याचा लिलाव केला जावा,आणि गरिबांचे पैसे परत केले जावेत यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.
त्याबाबचा व्हिडीओ त्यांनी जाहीर केला आहे. तो सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी कडे पाठविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!