*कोकण Express*
*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचा निकाल शंभर टक्के कु.जगन्नाथ गांवकर प्रथम*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
राज्यात कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गतवर्षी शाळा नियमित सुरू होऊ शकल्या नाहीत.अशा परीस्थितीत विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिक्षण घेतले असून नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.यात त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला असून या प्रशालेतील 28विद्यार्थ्यांपैकी 10विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले,12विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर 6विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.कुमार जगन्नाथ सखाराम गांवकर याने 86.60%गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला,कु.आकाश कैलास घाडीगांवकर याने 85.60%गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु.सानिका विजय पवार हिने 83.80%गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री.बाबुराव बाणे, कार्याध्यक्ष श्री. शंकर घाडीगांवकर, सरचिटणीस श्री.अच्युत भावे, उपाध्यक्ष श्री.विजय घाडीगांवकर, खजिनदार श्री.भाऊराव घाडीगांवकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी,शालेय समिती अध्यक्ष श्री.उत्तम गांवकर, शालेय समिती सदस्य श्री,दिपक चव्हाण,श्री.संतोष गांवकर,श्री.दशरथ घाडीगांवकर, मुख्याध्यापक श्री वामन तर्फे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.