*कोकण Express*
*पालकमंत्र्याच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात…!*
*कणकवलीकडे येत असताना कासार्डे तळेकरवाडी येथे बसली गाडीला धडक…!*
*चार पोलीस जखमी ; जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल…!*
*कणकवलीीः संंजना हळदिवे*
वैभवाडी येथे पालकमंत्री उदय सामंत यांचा आज शिव संपर्क अभिनयानाचा दौरा होता.हा दौरा आटपून सायंकाळी उशिरा पालकमंत्री आपल्या ताफ्यासहित कणकवलीकडे येत असताना कासार्डे तळेकरवाडी दरम्यान ताफ्यातील पोलीसांच्या वाहनाला ताफ्यातील आर सी पी च्या पोलीस गाडीची धकड बसून अपघात झाला.या अपघात चार पोलीस जखमी झाले.असून त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत अधिक माहिती साठी संपर्क साधला असता याबाबतचे अधिक वृत्त समजू शकले नाही.