तौक्ते वादळातील नुकसान भरपाईपोटी मालवणला ११ कोटी ८८ लाखाची मदत

तौक्ते वादळातील नुकसान भरपाईपोटी मालवणला ११ कोटी ८८ लाखाची मदत

*कोकण Express*

*तौक्ते वादळातील नुकसान भरपाईपोटी मालवणला ११ कोटी ८८ लाखाची मदत*

*आम.वैभव नाईक यांनी दिली माहिती;नुकसानग्रस्तांच्या खात्यात थेट जमा होणार*

*मालवण ः प्रतिनिधी*

दोन महिन्यांपूर्वी कोकण किनारपट्टीवर आलेल्या तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपतग्रस्तांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून ४५ कोटी ३६ लाख रुपयांची मदत मिळाली असून मालवण तालुक्याला यापैकी ११ कोटी ८८ लाख रुपये मदत प्राप्त झाल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण तहसील कार्यालय येथे दिली. ही मदत नुकसानग्रस्तांच्या खात्यात थेट जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काही नुकसानग्रस्तांना प्राप्त झालेल्या मदतीचे मंजुरी पत्र प्रातिनिधिक स्वरूपात आम. नाईक यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. मे महिन्यात कोकण किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाने जबरदस्त तडाखा दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली. या नुकसानी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा धावता दौरा करत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य शासनाकडून चक्रीवादळ ग्रस्तांना दिलासा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपदग्रस्तांना ४५ कोटी ३६ लाख रुपये प्राप्त झाले असून यातील ११ कोटी ८८ लाख रुपये मालवण तालुक्यात मंजूर झाले आहेत. त्यापैकी २ कोटी ६५ लाख मत्स्य व्यवसायातील नुकसानीसाठी, ६ कोटी २३ लाख घरांच्या नुकसानीसाठी तर २ कोटी ७३ लाख शेतीच्या नुकसानीसाठी देण्यात आल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. याबाबतचे मंजुरी पत्र प्रातिनिधिक स्वरूपात गुरुवारी लाभार्थ्यांना देण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, नायब तहसीलदार आनंद मालवणकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बांधकाम सभापती मंदार केणी, तपस्वी मयेकर, बाबा सावंत, प्रसाद आडवणकर, विकी चोपडेकर, स्वप्नील आचरेकर, अनिल गावकर, तालुका कृषी अधिकारी गोसावी, मत्स्यव्यवसायच्या अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. एनडीआरएफ च्या निकषांवर ही मदत मिळाल्याने नुकसानग्रस्तांना जास्त मदत मिळाल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले. पंचनामे झालेल्या सर्वांना मदत मिळणार असून घरांच्या ११२० लाभार्थ्यांना, शेतीच्या ३२६० लाभार्थ्यांना, मत्स्यव्यवसायच्या ९६९ लाभार्थ्यांना तर कुक्कुटपालनच्या ६ लाभार्थ्यांना ही मदत मिळाली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांचे आम. नाईक यांनी यावेळी आभार मानले. यावेळी आमदार नाईक म्हणाले, तौक्ते वादळाचा तडाखा मालवण तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसून येथील घरांचे, शेतीचे, मासेमारीचे मोठे नुकसान झाले. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी मालवणचा दौरा करत पाहणी केली. मुख्यमंत्री मालवणात केवळ पाय लावून गेले अशी टीका विरोधकांनी केली होती. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना भरीव अशी मदत दिली आहे. मच्छीमारांनाही यापूर्वी कधी मिळाली नाही अशी २ कोटी ६५ लाख एवढी भरीव मदत मिळाली आहे, असेही आम. नाईक म्हणाले. आम. वैभव नाईक यांनी स्वतः जातिनिशी या मदतीचा आढावा घेतल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच मदत निधी उपलब्ध झाल्याचे प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!