*कणकवली तालुक्यातील जोडरस्ते प्रश्नी खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेणार-सतीश सावंत*

*कणकवली तालुक्यातील जोडरस्ते प्रश्नी खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेणार-सतीश सावंत*

  • *कणकवली तालुक्यातील जोडरस्ते प्रश्नी खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेणार-सतीश सावंत*

 

 

*जोडरस्त्याच्या समस्या महामार्ग अधिकारी व तहसीलदार रमेश पवार यांच्यासमवेत केली पाहणी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील अंतर्गत रस्ते तसेच गावात जाणारे जोडरस्ते हायवेलगत आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची येण्या- जाण्याची गैरसोय होत आहे. त्यामध्ये बोर्डवे गावात जाणाऱ्या मार्गावर क्रॉस सिंग्नल व गतीरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार कणकवली रमेश पवार, दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार पाहणी करनेकरिता जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, मा. तहसीलदार कणकवली रमेश पवार, दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी श्री. परिहार यांनी एकत्रित केली.
यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, संदेश पटेल शाखा प्रमुख विवेक एकावडे, शाखाप्रमुख महिला शोभा बागवे, श्री. मोहन येडे, श्री. येडे सर, नरेश येडे, संतोष येडे, मनीष दळवी,प्रकाश शिंदें, शरद साळवी, प्रदीप राणे, गणेश राणे, माजी उपसरपंच बोर्डवे अहमद शेख आदी बोर्डवे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी तहसीलदार रमेश पवार व हायवे अधिकारी श्री. परिहार व ग्रामस्थासमवेत पाहणी व चर्चा केली. त्यावर उपाय करण्याचे आश्वासन लवकरच रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितित महसूल विभाग, हायवे प्राधिकरण, ठेकेदार कंपनी,आरटीओ व मागणी करणारे ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेऊन यावर योग्य तो तोड्गा काढण्याचे आश्वासन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!